परिसासी लोह लागती ते
1241.
परिसासी लोह लागती ते कनकाची होती | तया मागील ते गती बोलो नये ॥१॥
आड ओहोळ वाहती ते गंगेसी मिळती | तया मागील ते गती बोलो नये ॥२॥
काक विष्टा करिती तेथे पिंपळ होती | तया मागील ते गती बोलो नये ॥३॥
परीद्वारी होती परीसरसे होय सती | तया मागील ते गती बोलो नये ॥४॥
नामा मध्यम जाती परीस प्रेमळ भक्ती | तया मागील ते गती बोलो नये ॥५॥
