वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 165. कुल जन्म वृत्तांत

दृष्टि उघडुनि नामा भ

🙏 4. संत नामदेव · ABH-082375 · अभंग क्र. १२५५

1255.
दृष्टि उघडुनि नामा भोंवती जंव पाहे | तंव पुढे माय देखियेली ॥१॥
म्हणे मजद्षी नाम्या वैर का साधिले| बहुत दुःख जाले कोणा सांगो ॥२॥
भक्तजनवत्सला परियेसी केशवा | भेटवी केधवा पूर्वस्थिती ॥३॥
भोजना बसले जेवी क्षुधाक्रांत | न कोणाशी मात न बोले कांही ॥४॥
ते बळे उठविले नव्हता पै तृप्ती | तैसी दु:खप्राप्ति जाली मज ॥५॥
पूर्ण पान्हा धेनु यांतला बोरसे | वत्स थोर हर्षे पान करी ॥६॥
ते धनिये देखोनि बळे आसुंडले | तळमळित ठेले थोर आशा ॥७॥
कृपणे संपत्ति जोडिली सायासे | तळमळी ते कैसे नेलियाते ॥८॥
तसी परी मज जाहली गा देवा | परियेसी केशवा मायबापा ॥९॥
दुःखाचे सागरी पडिलो गा श्रीहरि | सुखरूप मुरारी निववी माते ॥१०॥
नामा म्हणे विठो कृपेचा सागरू | करावा अंगिकार अनाथाचा ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग