सदा वाचे नामावळी । न
1257.
सदा वाचे नामावळी । नित्य जिव्हा ज्याची चाळी । पातकांचे होळी । होत तेणे केली ये ॥१॥
नको ध्यानधारणा आसन । वाचे सदा नारायण । केलिया ऐसा नेम जाण । मेरुसमान सुकृत ॥२॥
उपमा नव्हे तया नरा । जनार्दन तो निर्धारा । एका जनार्दनी बरा । त्याचा सांगात घडता ॥३॥
