निवंत बैसोनि सुखें ग
1241.
निवंत बैसोनि सुखें गाय नाम । भेदाभेद काम परते सांडी ॥१॥
हेचि एक खुण परमार्थ पुरता । मोक्ष सायुज्यता हाता चढे ॥२॥
लौकिक वेव्हार आहे तैसा पाहे । जो जो होत जाये जे जे वेळ ॥३॥
कर्म धर्म त्तत्त्वतां बीज हे सर्वथा । एका जनार्दनी पुरता योग साधे ॥४॥
