वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 165. कुल जन्म वृत्तांत

उठोनि प्रातःकाळी ओढि

🙏 4. संत नामदेव · ABH-082377 · अभंग क्र. १२५१

1251.
उठोनि प्रातःकाळी ओढिता काचोळी | जातो वेळोवेळी महाद्वारी ॥१॥
अहो जी दातारा विनवी अवधारा | तुम्ही यावे घरा भोजनासी ॥२॥
रखुमाई सांगाते तुम्ही यावे तेथे | सामोग्री सांगाते चालवावी ॥३॥
सडा संमार्जन हे माझे करणे | उदक भरणे सुगंधेंसी ॥४॥
शेणपत्रावळी काढीत उष्टावळी | नित्य वेळोवेळी हाचि धंदा ॥५॥
नामा म्हणे देवा तुमचे तुम्ही जेवा | प्रसाद तो द्यावा सेवकासी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग