वेदाभ्यास नको सायास
1259.
वेदाभ्यास नको सायास ज्योतिष । नामाचा लेश तेथे नाही ॥१॥
बहुत व्युत्पत्ती सांगती पुराण । व्यर्थ स्मरण नाम नाही ॥२॥
अनंत हे नाम जयापासुनि जाले । ते वर्म चुकले संतसेवा ॥३॥
संतांसी शरण गेलिया वांचुनि । एका जनार्दनी न कळे नाम ॥४॥
