वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २२. हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो

भाव भक्तीचा भुकेला ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089168 · अभंग क्र. १२४४

1244.
भाव भक्तीचा भुकेला ।
दास दासांचा अंकिला ।
न वजे दुरी उभा ठेला ।
अवघा झाला त्यांचाचि ॥१॥
भक्तवचने ऐके कानी ।
भक्त आवडी पाहे नयनी ।
भक्त ह्रदयी आलिंगुनी ।
निज ऐश्वर्य अर्पी त्या ॥२॥
भक्त मानी जीवप्राण ।
त्यासी न त्या विसंबे एकही क्षण ।
त्यांचे वागवी हा भूषण ।
निंबलोण उतरी त्या ॥३॥
जीव भाव देवावरी ।
जिही ठेविला निजनिर्धारी ।
देवावीण दुसरी परी ।
तुच्छ मानिले संसारा ॥४॥
न लगे वैकुंठ त्यांचिये चित्ती ।
कैवल्याते परते करिती ।
देवावीण ते नेघो म्हणती ।
मोक्ष मुक्ती फुकटा ॥५॥
देवाविण रिध्दीसिध्दी ।
ओंवाळुनी सांडिती त्या उपाधी ।
देवा वेगळी त्यांचिये बुध्दी ।
नाहीचि विश्रांति आणिक ॥६॥
निळा म्हणे त्यांचिये घरी ।
राहे होउनी अंकित हरि ।
भक्त काज हा कैवारी ।
ब्रीदे वागवी सर्वदा ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग