कुश्चळ भूमीवरी उगवली
1243.
कुश्चळ भूमीवरी उगवली तुळसी | अपवित्र तियेसी म्हणो नये ॥१॥
काकविष्टेमाजी जन्मे तो पिंपळ | तया अमंगळ म्हणो नये ॥२॥
दासीचिया पुत्रा राज्यपद आले | उपमा मागील देऊ नये ॥३॥
नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी | उपमा जातीची देऊ नये ॥४॥
