लोखंडाचा विळा परिसास
1242.
लोखंडाचा विळा परिसासी लाविला | मागिलिया मोला मागू नये ॥१॥
दासी होती परि रायासी रतली | मागील ते बोली बोलो नये ॥२॥
वेश्या होती तेचि पतिव्रता जाली | मागील ते बोली बोलो तये ॥३॥
विष्णुदास नामा विठ्ठली रंगला | तो शिंपी वहिला म्हणो तये ॥४॥
