वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 159. निवृत्तीनाथ महाराज नमन

काय म्या बोलावे किती

🙏 4. संत नामदेव · ABH-081866 · अभंग क्र. १२०७

1207.
काय म्या बोलावे किती माझी मति | तुम्ही रमापति गोड केले ॥१॥
विश्वरूप घडी उघडिली धडफुडी | आता काय थोडी कृपा म्हणू ॥२॥
चिन्मय लहरी येती उन्मळुनी | दया नारायणी थोर केली ॥३॥
समाधि चरित्र केले यथामति | रखूमाईचा पति आर्जदिला ॥४॥
समाधि चरित्र जो करील श्रवण | तयालागी पेणे वैकुंठीचे ॥५॥
नामा म्हणे देवगुरु धरील चित्ती | उद्धरील पति रुक्माईचा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग