वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 159. निवृत्तीनाथ महाराज नमन

गेले दिगंबर ईश्वर वि

🙏 4. संत नामदेव · ABH-081873 · अभंग क्र. १२०४

1204.
गेले दिगंबर ईश्वर विभूति | राहिल्या त्या कीर्ति जगामाजी ॥१॥
वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानी | आता ऐसे कोणी होणे नाही ॥२॥
सांगतील ज्ञान म्हणतील खूण | नयेचि साधन निवृत्तीचे ॥३॥
|परब्रह्म डोळा दावू ऐसे म्हणती | कोणा नये युक्ति ज्ञानोबाची ॥४॥
करतील अर्थ सांगतील परमार्थ | नये पा एकांत सोपानाचा ॥५॥
नामा म्हणे देवा सांगूनिया कांही | नये मुक्ताबाई गुह्य तुझे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग