टाळ हे मृदंग गायने प
1194.
टाळ हे मृदंग गायने पुढती | रंजविती निवृत्ति अवघेजण ॥१॥
गीतार्थ करिती योगी मुनिजन | रंजविती मन निवृत्तीचे ॥२॥
आत्मसुख एक बोलती बोलणी | ज्ञानराज मनी आठवतो | | ३॥ज्ञानराजे आमुचे निवविले डोळे | आता ऐसे खेळे नाही कोणी ॥४॥
ऐकावा हा अर्थ मुक्ताईच्या मुखी | आता ऐसी सखी नाही कोणी ॥५॥
नामा म्हणे स्वामी सांगता प्रमाण | ऐकता श्रवण खेद वाढे ॥६॥
