वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

वांजा गाई दुभती । दे

🙏 3. संत तुकाराम · ABH-079069 · अभंग क्र. ११९४

1194.
वांजा गाई दुभती । देवा ऐसी तुझी ख्याति ॥१॥
ऐसे मागत नाही तुज । चरण दाखवावे मज ॥धृपद॥
चातक पाखरू । त्यासी वर्षे मेघधारु ॥२॥
पक्षी राजहंस । अमोलिक मोती त्यास ॥३॥
तुका म्हणे देवा । का गा खोचलासी जीवा ॥४॥

अर्थ :
देवा तुझी ख्याती अशी आहे की तुझ्या कृपा आशीर्वादाने वांज गाय देखील दूध देते. पण देवा मी तुला अशी संसारिक गोष्ट मागणार नाही मला फक्त तुझ्या चरणांचे दर्शन दे एवढेच. चातक पक्षासाठी पावसाच्या एका थेंबाची गरज असते परंतु त्याच्यासाठी मेघ भरपूर प्रमाणात वृष्टी करतो. राजहंस नावाच्या पक्षाला अमोलिक मोती खाणे आवडते. तुकाराम महाराज म्हणतात हे ब्राम्‍हणदेवा मी असे बोलल्या मुळे तुम्हाला एवढे का बरे बोचले.. (तुकाराम महाराजांनी चिंचवडच्या चिंतामण पूजार्यांच्याशी हे भाषण केले आहे तेच ह्या अभंगात आहे. )

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग