नामेंचि तरलें नामेंच
1205.
नामेंचि तरलें नामेंचि तरले । जडजीव उद्धरिले कलियुगी ॥१॥
ऐसे नाम समर्थ नाम विख्यात । नामेंचि पवित्र नरनारी ॥२॥
पापांचे पर्वत नामाग्नीनें शांत । येरा कोण मात नामापुढे ॥३॥
एका जनार्दनी तारक हे नाम । पावती निजधाम गाता वाचे ॥४॥
