आळंकापुरीस पांडुरंग
1210.
आळंकापुरीस पांडुरंग गेले | समाधिस्थ केले ज्ञानदेवा ॥१॥
उरकोनी सोहळा संगे संतमेळा | विठोबा राहिला आळंदीस ॥२॥
पाहे चक्रपाणि नाम्या डोळ्या पाणी | कंठ तो दाटुनि उगा आहे ॥३॥
पुसे रुक्मिणीकांत का रे तू निवांत | नाम्या शोकाक्रांत कोण्या दुःखे ॥४॥
