भक्त् पूजिती भगवंता
1193.
भक्त् पूजिती भगवंता ।
भगवंत पूजी आपुल्या भक्ता ॥१॥
ऐसा प्रीतीचा कळवळा ।
परस्परे हा सोहळा ॥२॥
भक्ता देवातेचि उमगी ।
देवहि धावे तयालागी ॥३॥
निळा म्हणे एकी एक ।
वसोनि भिन्नत्वाचे बीक ॥४॥
1193.
भक्त् पूजिती भगवंता ।
भगवंत पूजी आपुल्या भक्ता ॥१॥
ऐसा प्रीतीचा कळवळा ।
परस्परे हा सोहळा ॥२॥
भक्ता देवातेचि उमगी ।
देवहि धावे तयालागी ॥३॥
निळा म्हणे एकी एक ।
वसोनि भिन्नत्वाचे बीक ॥४॥