विचारिता तुज नामाची
1201.
विचारिता तुज नामाची नसे । नामरुपी तुझे स्वरुप भासे ॥१॥
नाम आरामता पाउनी पठण । यापरी स्मरिजे या नांव पठण ॥२॥
गर्जत नामी जो जो शब्द उठी । शब्दानुशब्दा पडतसे मिठी ॥३॥
एका जनार्दनी नित्य स्मरे नाम । नामरुप जाला आत्माराम ॥४॥