जेणे नाम धरिले कंठी
1197.
जेणे नाम धरिले कंठी । धावें त्यांच्या पाठी पोटी ॥१॥
नामे गाता जनी वनी । आपण उभा तेथे जाउनी ॥२॥
नामासाठी मागे धावें । इच्छिअलें तेणे पुरवावे ॥३॥
यातीकुळ तयाचे । न पाहे कांही सांचे ॥४॥
वर्णाची तो चाड नाही । नाम गाता उभा नाही ॥५॥
एका जनार्दनी भोळा । नामासाठी अंकित जाला ॥६॥
