वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २१. देवभक्त यांची एकरुपता

म्हणवूनि तुम्हा नित्

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089109 · अभंग क्र. ११९६

1196.
म्हणवूनि तुम्हा नित्य आठविती ।
या हो या हो म्हणती पांडुरंगा ॥१॥
तुम्ही धावोनिया येता वरावरी ।
पुरविता श्रीहरि आर्त त्यांचे ॥२॥
न साहे वियोग तुम्हा उभयता ।
देवा आणि भक्ता एकवंकी ॥३॥
निळा म्हणे दोन्ही पिंड एक जीव ।
जाणती हा भाव निगमादिक ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग