नाम घेता हे वैखरी ।
1202.
नाम घेता हे वैखरी । चित्त धांवें विषयांवरी ॥१॥
कैसे होता हे स्मरण । स्मरणामाजी विस्मरण ॥२॥
नामरुपा नव्हता मेळा । नुसता वाचेचा गोंधळ ॥३॥
एका जनार्दनी छंद । बोलामाजीं परमानंद ॥४॥