वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २२. हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो

ज्या ज्या भक्ती जेथे

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089158 · अभंग क्र. १२१४

1214.
ज्या ज्या भक्ती जेथे जेथे ।
पाचारिले ज्या ज्या आर्थे ।
तुम्ही जाउनिया तेथे ।
साह्य केले श्रीहरी ॥१॥
आर्ते गजेद्राचे स्तवन ।
ऐकताचि पदाभिगमन ।
करुनिया त्याची अर्ति हरण ।
निजधामाप्रती पाठविला ॥२॥
जिज्ञासता जनका अंगी ।
तुमचे जाणवयालागी ।
त्यासि ज्ञान देऊनिया विषय भोगी ।
विदेही करुनि ठेविला ॥३॥
अर्थार्थी तो विभीषण ।
त्यासि लंकापति करुनि पूर्ण ।
स्थापिला चिरंजीवपद देऊन ।
अर्थदान त्या दीधले ॥४॥
शुकसनकादिक ज्ञाने ।
अनुसरले आत्माचिंतने ।
त्यासि देऊनिया निजात्मज्ञान ।
जीवन्मुक्तपदी बैसविले ॥५॥
चतुर्विधा मुक्ति चारी भक्त ।
तुमचे कृपे परम मुक्त ।
उपमन्या क्षुधार्ती आळवीत ।
तया क्षीरसिंधु दिधला ॥६॥
ध्रुवे केले तुमचे स्तवन ।
मागे बैसावया निजस्थान ।
तयाते ध्रुवपदी बैसवून ।
केला वरिष्ठ सकळांसी ॥७॥
सुदाम देव तो लाचारी ।
तीनचि मुष्टी पोहे हरी ।
तेचि घालुनिया मुखाभीतरी ।
सुवर्ण नगरी दिधली त्या ॥८॥
स्तंभी प्रल्हाद पाचारी ।
तत्काळ प्रगटोनिया नरहरि ।
हिरण्यकश्यपाते विदारी ।
आणि कुरवाळी निजभक्ता ॥९॥
निळा म्हणे ऐशी कीर्ति ।
केली चरित्रे श्रीपती ।
अपार हरिभक्ता अपार हस्ती ।
अपार दिधली वरदाने ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग