वेदांचे वचन शास्त्रा
1204.
वेदांचे वचन शास्त्रांचे अनुमोदन । पुराणीं कथन हेंचि केले ॥१॥
कलियुगामाजीं नाम एक सार । व्यसाची निर्धार वचनोक्ति ॥२॥
तरतील येणे विश्वासी जे नर । तत्संगें दुराचार उद्धरती ॥३॥
एका जनार्दनी ऐसा हा अनुभव । प्रत्यक्ष सांगे देव उद्धवासी ॥४॥
