नारा महादा गोंदा विठ
1200.
नारा महादा गोंदा विठा जाले विकळ | झाकियेली शीळ समाधीची ॥१॥
गंधर्व आणि देव चिंतावले भारी | दीर्घध्वनि करी नारा विठा ॥२॥
गोंदा आणि महादा सांडिती द्षरीर | विसोबा खेचर फार कष्टी ॥३॥
लोपलासे भानू पडला अंधार | गेला योगेदवर निवृत्तिराज ॥४॥
गेल्या त्या विभूति अनादि अवतार | आता देवा फार आठवते ॥५॥
नामा म्हणे हरि धरवेना धीर | येती गहिवर बोसंडोनी ॥६॥
