सुंदर नारायण गौरविले
1201.
सुंदर नारायण गौरविले फार | केला नमस्कार वैष्णवांनी ॥१॥
सुरस सर्व॑ तीथे आदि पुरातन | केली नारायणे तीर्थयात्रा ॥२॥
विसोबा खेचर परिसा भागवत | अनेक ते संत बसविले ॥३॥
मध्ये निवृत्तिराज पांडुरंग पुंडलिक | पाहाती कौतुक गौतमीचे ॥४॥
दशमीचे दिवशी केले ते प्रस्थान | विधि नारायण सांगतसे ॥५॥
नामा म्हणे श्रीरंगा गौरविले सकळ | जालासे विकळ निवृत्तिराज ॥६॥
