आपुल्या नामा आपण वाढ
1200.
आपुल्या नामा आपण वाढवी । भक्तपणस्वयें मिरवीं । अवतार नाना दावी । लाघव आपुले ॥१॥
करी भक्तांचे पाळण । वाढवी त्यांचे महिमान । तयासी नेदी उणीव जाण । वागवी ब्रीद नामाचे ॥२॥
करी नीच काम नाही थोरपण । खाय भाजींचें आनंदें पान । तृप्त होय एका जनार्दनी । तेणे समाधान होतसें ॥३॥
