नानापरी खेद आठविती म
1205.
नानापरी खेद आठविती मना | आता नारायणा सिद्धि न्यावे ॥१॥
समाधीसी केली आरति पंचारती | राहिली निवृत्ति स्वरूपी तुझ्या ॥२॥
सुखाचे साधन जाली चौघेजणे | केली नारायणे बोळवण ॥३॥
पंचक्रोशावरी उभे ठेले भार | केला नमस्कार समाधीसी ॥४॥
नामा म्हणे आता जावे पंढरपुरा | समाधीचा सारा विधि जाला ॥५॥
