ज्याचा केला अंगिकार
1212.
ज्याचा केला अंगिकार ।
चालवी भार त्याचा हा ॥१॥
ऐसा आहे कृपावंत ।
सद्गुरुनाथ दीनांचा ॥२॥
देऊनिया बोधबुध्दी ।
निरसी उपाधी ममतेच्या ॥३॥
निळा म्हणे मेळवी सुखा ।
न म्हणे परिखा जीवजंतु ॥४॥
1212.
ज्याचा केला अंगिकार ।
चालवी भार त्याचा हा ॥१॥
ऐसा आहे कृपावंत ।
सद्गुरुनाथ दीनांचा ॥२॥
देऊनिया बोधबुध्दी ।
निरसी उपाधी ममतेच्या ॥३॥
निळा म्हणे मेळवी सुखा ।
न म्हणे परिखा जीवजंतु ॥४॥