हरी हा भक्तांच्या अं
1197.
हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो
अनुरागे भजती देवा ।
त्यांच्या भावा साक्षी तो ॥१॥
म्हणोनिया मागे पुढे ।
धावे कोडे सांभाळी ॥२॥
भुके ताने करी चिंता ।
लागो नेदी त्या ऊनवारा ॥३॥
निळा म्हणे अंतरसाक्षी ।
सदा कैंपक्षी दासाचा ॥४॥
