वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 158. निवृत्तीनाथ समाधी

वंदिली अंबिका निघाले

🙏 4. संत नामदेव · ABH-081525 · अभंग क्र. १२००

1200.
वंदिली अंबिका निघाले बाहेर | कीर्तन गजर पुढे होत ॥१॥
गोदातीरी क्षेत्र धन्य त्र्यंबकेश्वर | उतरले भार वैष्णवांचे ॥२॥
म्हणती पांडुरंगे दावियेले स्थळ | निवृत्तिराज विकळ पार जाले ॥३॥
पंचमीचे दिवशी गेले पंचवटी | उतरले तटी गौतमीचे ॥४॥
नामा म्हणे शेवट केला वनमाळी | रहाती ये स्थळी निवृत्तिराज ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग