भाग्याचें ते नारीनार
1213.
भाग्याचें ते नारीनार । गाती निरंतर मुखी नाम ॥१॥
धन्य धन्य त्याचा जन्म । सुफळ सर्व कर्म धर्म ॥२॥
उपासना त्यांची निकी । सदा नाम गातीं मुखी ॥३॥
नामापरते आन । त्यासी नाही पै साधन ॥४॥
एका जनार्दनी नामे गाय । त्यांचे वंदितसे पाय ॥५॥
