जयजयकारे टाळी पिटिली
1203.
जयजयकारे टाळी पिटिली सकळी | चालली मंडळी वैष्णवांची ॥१॥
पंढरीचा पोहा निघाला बाहेरी | कीर्तन गजरी पुढे होत ॥२॥
विठोबा रखुमाई बैसली गरुडावर | केला नमस्कार वैष्णवांनी ॥३॥
म्हणती तीर्थयात्रा जाली यथासांग | पाहिले प्रसंग समाधीचे ॥४॥
गेले योगिराज अनादि जे आदि | राहिल्या समाधि जगामाजी ॥५॥
नामा म्हणे देवा गेले मुनिजन | राहिले ते ज्ञान जगामाजी ॥६॥
