तुळसी बेल पुष्पे समर
1204.
तुळसी बेल पुष्पे समर्पिली वर | पाहाती ऋषीवर पहिली पूजा ॥१॥
नारा विठा गोंदा पाठविला महादा | झाडावया शेजा पुढे जाले ॥२॥
सभोंवती जागा झाडिली निर्मळ | अनादि हे स्थळ निवृत्तिराजा ॥३॥
संभोंबते दीप लाविले समाधी | म्हणती पूजा आधी केली असे ॥४॥
अनादि हे पूजा केली म्हणती संत | आता कोणी आंत उतरू नये ॥५॥
नामा म्हणे हरि काय स्थळ चांगले | दुर्वा दर्भ फुले वाहियेली ॥६॥
