भिन्न दावूनिया एक ।
1195.
भिन्न दावूनिया एक ।
एकी भिन्नत्वाचे बीक ॥१॥
जेवि बिंब प्रतिबिंब ।
दोन्ही एकचि ते स्वंयभ ॥२॥
जैसी गोडी आणि गूळ ।
कापूर तोचि परिमळ ॥३॥
निळा म्हणे देवा भक्ता ।
निवडी कोण भिन्न आता ॥४॥
1195.
भिन्न दावूनिया एक ।
एकी भिन्नत्वाचे बीक ॥१॥
जेवि बिंब प्रतिबिंब ।
दोन्ही एकचि ते स्वंयभ ॥२॥
जैसी गोडी आणि गूळ ।
कापूर तोचि परिमळ ॥३॥
निळा म्हणे देवा भक्ता ।
निवडी कोण भिन्न आता ॥४॥