वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

भोक्ता नारायण लक्षुम

🙏 3. संत तुकाराम · ABH-079113 · अभंग क्र. ११९७

1197.
भोक्ता नारायण लक्षुमीचा पति । म्हणोनि प्राणाहुती घेतलिया ॥१॥
भर्ता आणि भोक्ता कर्त्ता आणि करविता । आपण सहजता पूर्णकाम ॥धृपद॥
विश्वंभर कृपादृष्टी सांभाळीत । प्रार्थना करीत ब्राम्हणांची ॥२॥
कवळोकवळी नाम घ्या गोविंदाचे । भोजन भक्ताचे तुका म्हणे ॥३॥

अर्थ :
तुकाराम महाराजांनी चिंचवडच्या गणपती मोरयाला अन्नग्रहण करण्यासाठी बोलावताच श्री विठ्ठल गणरायाच्या रूपात तेथे अन्नग्रहण करण्यासाठी आले आणि त्यांना पाहताच “लक्ष्मीचा पती नारायण जो सर्व अन्नाचा भोक्ता आहे” याअर्थ : चा मंत्र म्हणून महाराजांनी व सर्वानी प्राणहुती घेतली व देवच सर्वाचा पालन करता आहे, भोक्ता आहे, कर्ता आहे, करविता आहे आणि तोच पूर्ण काम आहे असा हा विश्वंभर सर्वावर कृपादृष्टी ठेवून सर्वाचा सांभाळ करणारा आहे, तो सर्व ब्राम्‍हणांना सावकाश होऊ द्या अशी प्रार्थना करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे देव आणि भक्तांचे एका पंगतिला भोजन होत आहे त्यामुळे प्रत्येक घासाला गोविंदाचे नाम घेत भोजन करावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग