शुकादिक योगी रंगले श
1203.
शुकादिक योगी रंगले श्रीरंगी । नाम पवित्र जगी जपा आधी ॥१॥
साधने साधितां कष्ट होती जीवा । नाम सोपे सर्वा गोड गाता ॥२॥
परंपरा नाम वाचे ते सुगम । सनकादिक श्रम न करिती ॥३॥
एका जनार्दनी नाम ते पावन । वाचे उच्चारिता जाण श्रम हरे ॥४॥
