अंतर कोणा नेदी सहसा
1206.
अंतर कोणा नेदी सहसा ।
आपुलिया दासा सांभाळी ॥१॥
परम कृपावंत हरी ।
नामोच्चारी प्रगट होय ॥२॥
यांची निष्ठा बाणली ज्यासी ।
कदाही त्यासी न विसंबे ॥३॥
निळा म्हणे जवळचि राहे
ऐसा भक्त मोहे मोहितु ॥४॥
1206.
अंतर कोणा नेदी सहसा ।
आपुलिया दासा सांभाळी ॥१॥
परम कृपावंत हरी ।
नामोच्चारी प्रगट होय ॥२॥
यांची निष्ठा बाणली ज्यासी ।
कदाही त्यासी न विसंबे ॥३॥
निळा म्हणे जवळचि राहे
ऐसा भक्त मोहे मोहितु ॥४॥