भक्ती देवाते पूजिले
1194.
भक्ती देवाते पूजिले ।
देवे भक्ता सन्मानिले ॥१॥
ऐसे भजती येरयेरा ।
जैसे जळ आणि जळगारा ॥२॥
भक्त देवाजवळी बैसे ।
देव भक्ता घरी वसे ॥३॥
निळा म्हणे देवा भक्ता ।
सर्वकाळी एकात्मता ॥४॥
1194.
भक्ती देवाते पूजिले ।
देवे भक्ता सन्मानिले ॥१॥
ऐसे भजती येरयेरा ।
जैसे जळ आणि जळगारा ॥२॥
भक्त देवाजवळी बैसे ।
देव भक्ता घरी वसे ॥३॥
निळा म्हणे देवा भक्ता ।
सर्वकाळी एकात्मता ॥४॥