शेवटची समाधि जाली जस
1206.
शेवटची समाधि जाली जसी तैसी | तुज हृषिकेशी समर्पिली ॥१॥
आपुल्या सत्ताबळे चालविले हरि | विष्णुदासावरी कृपा केली ॥२॥
|नेणो कैसा होईल समाधीचा प्रसंग | बोलिलेति अंगे पांडुरंगा ॥३॥
मुकियाला वाचा दिधली श्रीरंगे | इच्छिला प्रसंग सिद्धी नेला ॥४॥
नामा म्हणे देव माय बाप विठ्ठल | म्हणोनि माझे बोल स्वीकारिले ॥५॥
