सहसमुदायेसी उठावे शा
1202.
सहसमुदायेसी उठावे शारंगधरा | हरिहरेश्वरा जाऊ आता ॥१॥
उठले वैष्णव आणि हृषिकेशी | आले त्र्यंबकासी निवृत्तिराज ॥२॥
एकादशी व्रत वद्य ज्येष्ठ मासी | उत्सव निवृत्तीसी देवे केला ॥३॥
दादद्षी पारणे सोडिती वैष्णव | समारंभ देव करितसे ॥४॥
राहिली ते शक्ति गळाले शरीर | देह अहंकार त्यागियेला ॥५॥
कोणाची करावी पूजा कोणे कोणा | अवघे नारायणा करणे येथे ॥६॥
नामा म्हणे देवा मुक्ताईची गती | सांडिले निवृत्ति शरीरासी ॥७॥
