वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

तंव ते सकळ भक्त आले

🙏 4. संत नामदेव · ABH-081604 · अभंग क्र. ९६२

962.
तंव ते सकळ भक्त आले शीघ्रवत | आनंदे गर्जत नामघोषे ॥१॥
प्रेमे उचंबळत अंतरी बोधले | सप्रेमे लोटले चरणांवरी ॥२॥
त्या सुखाचा आनंदु न वर्णवे वाचे | एवढे भाग्य कैंचे बोलावया ॥३॥
आलिंगोनि देवे धारिले हृदयकमळी | सादर सांभाळी कृपाद्रुष्टी ॥४॥
श्रीमुखाची वास पाहती वेळोवेळा | जाला एकवळा आनंदाचा ॥५॥
मग उदार चक्रवर्ती सर्वज्ञाचा रावो | सांगे जीवींचा भावो रुक्माईसी ॥६॥
केला चंद्रभागे संकल्प संपूर्ण | तो व्हावा उत्तीर्ण स्वभावे ॥७॥
क्षेत्रवासी द्विज सुशील सदाचार | जे पुण्यसागर भूदैवत ॥८॥
ज्यांचेनि दर्शने पाप ताप जाय | य॒शकीर्ति होय चरणरतीर्थे ॥९॥
तरी ते प्रार्थूनिया आजी आणावे त्रिभुवना | द्यावे त्या भोजना भक्तिभावे ॥१०॥
तेणे सकळ काम होतील परिपूर्ण | घ्यावे आशीर्वचन ब्राह्मणांचे ॥११॥
तंव म्हणे रुक्माई ब्रह्मांडनायका | अक्षत सकळिका द्यावी देवा ॥१२॥
संकळहि सिद्धि असती सदोदित | कर जोडूनि तिष्ठत सकळ काम ॥१३॥
हांसाति पंढरीनाथ बोले कवतुके | जिवलगा आईके विष्णुदासा ॥१४॥
|पुढती कवतुक करणे तुजलागी | नामयासी वेगी कळली खूण ॥१५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग