वाळिले जे पंढरिनाथे
965.
वाळिले जे पंढरिनाथे ।
त्याचे कोण कार्य येथे ॥१॥
घाला आपणा बाहेरी ।
नका सांगो त्याची थोरी ॥२॥
आगम पहिला वेदात ।
चित्त विषयापे सतत ॥३॥
धने माने केले वेडे ।
सुख नेणती ते बापुडे ॥४॥
मान इच्छा चाड जीवी ।
काय करु ते गोसावी ॥५॥
जाती म्हणोनी आनाठाया ।
निळा दुर पासुनी तया ॥६॥
