नाही शब्दाधीन वर्म आ
956.
नाही शब्दाधीन वर्म आहे दुरी ।
नव्हे तंत्रमंत्री अनुभव तो ॥१॥
हर्षामर्ष आंगी आंदोलती लाटा ।
कामक्रोधे तटा सांडीयले ॥२॥
न सरे ते भक्ती विठोबाचे पाई ।
उपरती नाही जेथे चित्ता ॥३॥
निळा म्हणे सुख देहनिरसने ।
येर ते वचने व्यर्थ वाया ॥४॥
