कोण भाग्याचे ते लोक
953.
कोण भाग्याचे ते लोक ।
केले कौतुक तुम्ही ज्यांचे ॥१॥
वागउनिया कडिये खांदी ।
निजात्मपदी स्थापियले ॥२॥
ज्यांचिया वचनासाठी उडी ।
घालुनी तांतडी उभे ठाके ॥३॥
निळा म्हणे दिवस राती ।
जयांप्रती न विसंबा ॥४॥
953.
कोण भाग्याचे ते लोक ।
केले कौतुक तुम्ही ज्यांचे ॥१॥
वागउनिया कडिये खांदी ।
निजात्मपदी स्थापियले ॥२॥
ज्यांचिया वचनासाठी उडी ।
घालुनी तांतडी उभे ठाके ॥३॥
निळा म्हणे दिवस राती ।
जयांप्रती न विसंबा ॥४॥