वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

बाप आर्तबंधु सकळ जीव

🙏 4. संत नामदेव · ABH-081588 · अभंग क्र. ९६५

965.
बाप आर्तबंधु सकळ जीवनकंदू | भक्तांचा सुखसिंधु पंढरिरावो ॥१॥
हर्षे निर्भर चित्ती आले निजभुवना | सांगे विवंचना रुक्माईसी ॥२॥
धन्य दिवस जाला आजि सोनियाचा | सोहळा भक्तांचा आरंभिला ॥३॥
प्रार्थिले ब्राह्मणा भोजनालागुनी | येताती सारोनि स्नानविधी ॥४॥
आजीचे कवतुक पाहावे अभिन्न | हांसोनिया देव बोलते जाले ॥ ५ ‌॥तंव म्हणे रुक्माईअहो जी पूर्णकामा | स्वामी मेघश्यामा कृपानिधी ॥६॥
त्यांचे पूव पुष्य आजि आले फळा | देखिले गोपाळा चरण तुमचे ॥७॥
तंव ते नित्य नेम सारोनि आपुले | वेगी द्विज आले राउळांगणा ॥८॥
नमस्कारुनि देवे बसविले आसनी | पूजा चक्रपाणि आरंभिली ॥९॥
चरण प्रक्षाळूनी गंघ तुळसीमाळा | घातलिया गळा ब्राह्मणाच्या ॥१०॥
उजळोनि दीपक ओवाळिले प्रीति | मग ते पात्रपंक्ति मांडियेल्या ॥११॥
रत्नजडित सकळा सुवर्णाची ताटे | षड्रस बरवंटे तयामाजी ॥१२॥
विस्तारोनि वेगी 'ओगरिलीं. चांगे | संकल्प श्रीरंगे सोडियेला ॥१३॥
देउनि आपोशन अमरचूडामणी | प्राथितो जोडोनि करकमल ॥१४॥
कवळोकेवळी घ्यावे नाम अच्युताचे | भोजन भक्ताचे सुखरूप ॥॥१५॥
ऐसे जेविले आनंदे धाले परमानंदे | मुखशुद्धि गोविदे समर्पिली ॥१६॥
रत्नाचे दीपक उजाळोनि आरती | साष्टांग श्रीपति नमस्कारिले ॥१७॥
जोडोनि दोन्ही कर विनवितो श्रीरंग | आजीचा प्रसंग पुण्यकाळ ॥१८॥
आम्हा तुम्हा भेटी जाल्या सुखगोष्टी | भरली सकळ सुष्टी परमानंदे ॥१९॥
अवघे संतजन आमुचे सांगाती | जेवू एका पांती सरिसे आम्ही ॥२०॥
म्हणोनि सकळिका पाचारिले देवे | कवतुक अवघे पाहाती द्विज ॥२१॥
ब्रह्मादिक देव तिष्ठत पाहाती व्योमी | वंचलो रे आम्ही भक्ति सुखा ॥२२॥
सर्वप्रेम देउनि निवविला नामा | ऐसे भाग्य आम्हा कचे आता ॥२३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग