केशव म्हणे नाम्या सु
963.
केशव म्हणे नाम्या सुखाच्या निधाना | दे रे आलिंगना आवडत्या ॥१॥
जिवलगा जवळोनि नवजे कोठे दुरी | वाटे तुज अंतरी घालावासी ॥२॥
न पुरे माझे आत घेता तुझे सुख | मज नित्य तृप्ति भूक वाटे थोरी ॥३॥
उत्कंठित चित्त अखंड तुजकारणे | तुज देखिल्या पारणे होय नयना ॥४॥
अनंत जन्माचा हा ऋणानुबंधू | तरीच प्रीतिवादू न तुटे तुझा ॥५॥
तुवा मजलागोनि देह कर्वती दिधले | उग्र तप साधिले जन्मोजन्मी ॥६॥
त्यजोनि सर्व माया चित्त निरोधिले | हृदयी मज बांधिले गश्य करोनी ॥७॥
तुज काय देईजे उतराई होईजे | ऐसे न देखिजे त्रिभुवनी ॥८॥
शरीर प्राणाचे त्वा देऊनि बळिदान | केले पे निर्वाण भक्तराया ॥९॥
करावे म्या दास्यत्व आपुलेंनि अंगे | तुज तरी कांही नलगे देणे घेणे ॥१०॥
नामा म्हणे देवा तू दीनाचा कैवारी | म्हणोनि मजवरी करिसी मोहो ॥११॥
