वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 3. ज्ञानकांड रुपके › २०, कूट अभंग ९७१ ते ९९०

चिंचेच्या पानी एक शि

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074633 · अभंग क्र. ९७२

972.
चिंचेच्या पानी एक शिवालय उभविले आधी कळसु मग पाया रे ।
देव पुजो गेलो तव देऊळ उडाले प्रसिद्ध सद्गुरूराया रे ॥१॥
संतजना महंतजना तेथील ते गुज गोड रे ।
अनुभव अनुभविता कदाचित सरे पुरेल मनींचे कोड रे ॥२॥
उपजत नोवरी केळवली केळवला नोवरा नोवरी ।
पितया कंकण करी माता सुंदरी विपरीत गे माय कोडियाची परी ॥३॥
विपरीत कोडे गुरूगम्य कहाणी ऐके सगुण विरूळा ।
बापरखुमादेविवरू विठ्ठलु पाहता पाविजे तो सुखसोहळा ॥४॥

अर्थ :
या अभंगामध्ये चिंचेच्या पानी म्हणजे मायारूपी जी चिंच तीचे पाने म्हणजे अनंत देह असून त्या पानाच्या ठिकाणी अंतःकरणरूपी शिवालय निर्माण करून, आधि कळसु म्हणजे गर्भावस्थेमध्ये असलेला सोऽह प्रत्यय म्हणजे (तो परमात्मा मी आहे असे ज्ञान) मग पाया रे म्हणजे, बाहेर आल्यानंतर कोऽह हाच पाया आहे. कारण सधर्मक अंतःकरण सिद्धि कोऽह वरच अवलंबून आहे. परंतु देवपूजेमध्ये प्रसिद्ध असलेले सद्गुरुंनी मला पूजा म्हणजे अभिन्नत्वाने ज्ञान करून दिले. त्या देवाभिन्न पूजेत देऊळ उडाले म्हणजे सधर्मक अंतःकरणाचा बाध झाला. व विशेषण उडाले. परंतु हे गुह्य संत महात्म्यानाच गोड लागेल आणि अनुभव घेणारा याचीही वाच्यता न राहता त्याच्या मनाचे समाधान होईल. 'उपजत नोवरी केळवली, म्हणजे सद्गुरूने महावाक्योपदेशजन्य तू ब्रह्म आहेस असा वाङ्गनिश्चय झालेले नवरा नवरी यांचे लग्न झाले म्हणजे माता सुंदरी म्हणजे वृत्तिची आई असलेले जे अंतःकरण स्थिती तिने पितया म्हणजे आत्म्यास कंकण केली. कारण आत्म्यावर अंतःकरण अध्यस्त असल्यामुळे आणि अध्यस्त पदार्थ अधिष्ठानरूप असतो म्हणून ती आत्मरूप झाली. हे एक विपरीत कोडेच आहे. ही विपरीत कोड्याची काहाणी म्हणजे रीत जाणणारा एक गुरूपुत्र विरळा आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांनाच जाणले असतांना त्याच्या आनंदाच्या सुखसोहंळ्याचा लाभ होईल. असे माऊली सांगतात.

तपास करा
उगमेवीण पाणी वाहते सारणी ।
शिंपिती माळिणी वेळोंवेळा ॥१॥
नसे माळिणीचा मळा नसे सरोवर तळे ।
नित्य वेळो वेळो फुलतसे ॥२॥
ज्ञानदेव म्हणे ही खूण जाणा ।
षण्मास सुजाणा सूटि दिली ॥३॥

अर्थ :
सृष्टिदृष्टीवादांतून जगताची उत्पत्ति मायेपासून झालेली आहे असा वेदांतशास्त्राचा सिद्धांत आहे. परंतु माऊली या अभंगातून या सिद्धांताचे खंडण करतात. कारण मायारुपीसरोवरांतून जगद्रूपी पाणी, अनादि प्रवाहरुपी पाटातून वाहात आहे. व कल्पनारुपी माळीण त्या पाण्याने जन्ममरणरुपी मळ्याला सिंचन करीत आहे. व तो मळा अत्यंत प्रफुल्लित झालेला आहे, असे वाटते. परंतु विचार केला तर अजातवादाच्या दृष्टिने मायारुपी सरोवर नाही. व कल्पनारुपी माळीण नाही. म्हणूनच जन्ममरणरुपी मळाही नाही. हे सूज्ञ मनुष्या तुला या कोड्याचा उलगडा करण्याविषयी सहा महिन्याची मुदत दिली आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग