वेदशास्त्री गाईला पु
955.
वेदशास्त्री गाईला पुराणीं वर्णिला । तो शिव पाहिला डोळेभरीं ॥१॥
तेणे माझ्या मना होय समाधान । आठवितो चरण वेळोवेळीं ॥२॥
सकळ इंद्रियां झालीं पै विश्रांती । पाहता ती मूर्ती शंकराची ॥३॥
एका जनार्दनी शिव हा भजावा । संसार करावा सुखरुप ॥४॥
