वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 148. तीर्थावळी

परमामृत सागरु मथुनिय

🙏 4. संत नामदेव · ABH-081579 · अभंग क्र. ९७१

971.
परमामृत सागरु मथुनिया पुरता | काढिला तत्त्वता ज्ञानबोधु ॥१॥
या सुखाचा पारू जाणते विरळे | घेताती गळाळे संतजन ॥२॥
प्रेमाचिये ताटी वोगरू सुखामृत | हे सुख त्वरित सेवा आधी ॥३॥
हे सुख सेविता परमानंद धणी | कृपा संतजनी केली पूर्ण ॥४॥
ज्ञानाचे अंजन लेईले संतजन | जनी जनादन देखती सदा ॥५॥
नाही भिन्न भेद सर्व ब्रह्म एक | ब्रह्मांडनायक अनंत कोटी ॥६॥
दीपांचा दीपक हृदय आत्मज्योती | विश्वी विठ्ठलमूर्ती देखती सदा ॥७॥
हे सुख दिघले भक्तांसी विश्रांति | नामाची हे ख्याती परमानंद ॥८॥
पढता नाम मंत्र ब्रह्मचि अवघे | पाहता अनुभवे वेदमते ॥९॥
ते हे विठ्ठलनाम वेदाचे गव्हार | जाणती साचार संतजन ॥१०॥
युगे अठ्ठाविस विठ्ठलनामे जपतु | हा पुंडलीक भक्तु महामुनी ॥११॥
उघडली मांदूस भक्तिभाव तारू | विठ्ठल उद्धारू कलियुगी ॥१२॥
न लगती सायास करणे उपवास | विठ्ठलनामे पाश तुटती जाणा ॥१३॥
आदि ब्रह्म जुनाट जपती सिद्ध मुनी | ते दिले मंथोनि पुंडलिके ॥१४॥
|केशवनाम मंत्र नामया सांगितले | विस्तारोनि केले मंथन ऐसे ॥१५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग