वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 58. शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८

कर्मे नित्य नैमित्ती

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084283 · अभंग क्र. ९५९

959.
कर्मे नित्य नैमित्तीक । करावी ती आवश्यक ॥१॥
तेचि होय शिवपुजा । चित्तशुद्धि ते सहजा ॥२॥
मनःस्थिर ते कारण । करा शंकराचे ध्यान ॥३॥
गुरु होऊनि शंकर । ज्ञान उपदेशीं सत्वर ॥४॥
तेणे अज्ञानाचा नाश । प्राप्त होय अविनाश ॥५॥
एका जनार्दनी धर्म । ब्रह्माप्राप्तीचे हे वर्म ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग