वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 58. शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८

अकार उकार मकारां वेग

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084289 · अभंग क्र. ९५४

954.
अकार उकार मकारां वेगळां । परब्रह्मा पुतळा शिव एक ॥१॥
अंडज जारज स्वदेज उद्भिजां वेगळा । परब्रह्मा पुतळा शिव एक ॥२॥
प्राण अपान व्यान उदान समान । यांवेगळा जाण शिव एक ॥३॥
पृथ्वी आप तेज वायु आकाश । यांवेगळा भास शिव एक ॥४॥
द्वैता अद्वैता वेगळांचि जाण । एका जनार्दनी पूर्ण शिव एक ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग